स्त्रियांसमोर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा पिंजरा मोडणारा "बंदिशाळा"
कैदी जगला पाहिजे पण, तो माजला नाही पाहिजे अश्या विचाराने संजय पाटिल लिखित अणि मिलिंद लेले दिग्दर्शित एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला अणि अर्थातच तो म्हणजे
बंदिशाळा. एका सत्य घटनेवर आधारलेला अणि स्त्री शक्तिला जागवणारा हा चित्रपट आहे. एक प्रबळ, धडाकेबाज अणि तुरुंग अधिकारी च्या वेश्यात असलेली अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने माधवी सावंत या पात्राची भूमिका साकारलेली आहे, जिला आपलं काम करतांना खुप अडचणींना सामोर जाव लागत, तिच्या ह्या प्रवासाची ही गोष्ट आहे. ही भूमिका मुक्ता ने अतिशय उत्तम आणि पात्राला योग्य तो न्याय देवून निभावलेली आहे यावरून आपल्याला ती किती उत्कृष्ट नट आहे ते दिसून येतं. कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचनं काही वेगळ नाही याचे उदाहरण आपल्याला दिसून येइलं किंवा कोणी प्रमाणिकपणे चांगला बदल आणायाचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या कामात व्यत्यय कसे आणायचे हे आपल्याला वेगळ सांगायची गरज नाही. अर्थातच तुरुंगात पुरुषी वर्चस्व असल्याने समस्या अणि त्याच्यावर माधवी ने केलेली मात यांविषयीचा हा चित्रपट आहे.

हा चित्रपट एका ठराविक घटनेशी निगडित नसून तो समाजातील अनेक घटनांवर आधारलेला असल्याने कुठेतरी लेखकाच्या कथेत प्रमुख व्यक्रिरेखेकडे दुर्लक्ष झाले आहे. दिग्दर्शकाने या कथेला जरा फिल्मी रूप दिल्याने कथेचा अंत गोडाव्याने होतो, जे सत्य घटनेत होत नाही. चित्रपटात captain of the ship मुक्ता असल्याने बाकीच्या पात्रांकडे धोड दुर्लक्ष होताना दिसतयं. चित्रपटला साजेल असे गाने आणि संगीत लाभलेले आहेत.
पुरुष प्रधान संस्कृतिमध्ये जगत असतांना आम्ही विसरतो आमची शिकवण जी आम्हाला आमच्या धर्माने दिली, आमच्या देशाने दिली. आजही आम्ही आमच्या देवघरात पाहिलं तर, स्त्री अणि पुरुष अशी भावना मानत नसते किंबवूना आपण आपल्या कुलदेविला जास्त निष्ठेने अणि मनाभावने पुजतो. मग बाहेर गेल्यावर का आमच्या नजरा फिरतातं अणि शेकडो मुलींवर बलात्कार आणि महिलांच वारंवार शोषण होताना दिसत? हा अर्धताच वाईट कृत्य करणाराल्या ना धर्माची शिकावन असते ना पूर्वजांनी दिलेल्या विचारांची. असो,
शोषित महिलांना सशक्त अणि स्वालंबी बनवण्याचा प्रयत्न या चित्रपटातुन झाला आहे अणि आज समाजाला अश्याच धाडसी महिलांची गरज आहे.
*वेड आल्यावर स्री शक्ति काय असते याच तंतोतंत उदाहरन म्हणजे बंदिशाळा*
सिनेमा:बंदिशाळा
दिग्दर्शक: मिलिंद लेले
कलाकार: मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे, उमेश जगताप,अजय पुरकर, प्रवीण तरडे, हेमांगी कवी आणि इतर
वेळ: २ तास २0 मिनिटं
रेटींग: ३.५ stars
संगीत अणि गाने: अमितराज
Well written about the movie